संस्थेविषयी

श्रीयश एज्युकेशन फौंडेशन

श्री. सौ. एस. एस. सावंत यांचे मार्गदर्शनाखाली २०१० मध्ये श्रीयश एज्युकेशन फौंडेशन ही संस्था स्त्रीयांच्या सर्वागिण विकासासाठी स्थापन झाली. “समाज्यातील अगदी तळागाळातील महिलांचा विकास घडवायचा असेल तर प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली पाहिजे ” हे संस्थेचे प्रमुख ध्येय आहे. कारण स्वावलंबना शिवाय सामाजिक आणि आर्थिक विकास अशक्य आहे. म्हणुनच संस्थेमार्फत ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या दृष्टीने वर्षभर अनेक कोर्सेस उद्योगाविषयी विविध उपक्रम राबविले जातात.
संस्थेमार्फत अनेक यशस्वी सामाजिक उपक्रम राबविले जातात. स्त्री आरोग्य, माता बालसंगोपन, प्रौढ साक्षरता , अंधश्रद्धा निर्मूलन, अन्यायाविरुद्ध लढा, व्यसनमुक्ती, निराधार व विधवा महिलांचे पुनर्वसन, वृद्धाश्रम अशा सर्व उपक्रमांव्दारे महिला एकिकरणाचे काम संस्था करीत आहे.
श्रीयश एज्युकेशन फौंडेशन संस्थेने धनकडी, औंध, गोखलेनगर, सांगवी, धायरी, इंदिरानगर, कात्रज, शिवाजीनगर, कर्वेनगर, कोंढवा, काळेवाडी, पिंपरी, सहकारनगर, स्वारगेट, वडगांवशेरी, हडपसर, पुणे कँम्प, खडकी, कोथरुड, वारजे, चिंचवड, घोरपडी, कसबा, नारायण पेठ, अप्पर, बिबवेवाडी, पर्वती, सोमवार पेठ इत्यादी भागातिल महिलांना त्यांच्या भागात जाऊन अन्नप्रक्रिया, ब्युटीपार्लर, ज्वेलरी, बांगडी वर्क, मसाले पदार्थ, बेकरी पदार्थ, अगरबत्ती, खडु, गांडुळ प्रकल्प, उटणे, कागदी पिशवी, रोपवाटीका संगोपन, मेहंदी, रांगोळी, टिकली, परफ्युम, फँन्सी कुकरी, दुध प्रक्रिया उद्योग या विषयांचे प्रशिक्षण दिले. आजपर्यंत संस्थेने १० हजार महिलांना व्यवसायिक प्रशिक्षण दिली आहेत.
प्रशिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकास, स्वावलंबन व व्यवसाय करणा-या महिलांसाठी स्टॉल मिळवून देणे तसेच व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करणे, होतकरु महिलांना व्यासपीठ मिळवून देणे इत्यादी मध्यमाव्दारे संस्था महिलांना मदत करते. संस्थेने शंभर महिलांना व तिस पुरुषांना नोकरीच्या माध्यमातून रोजगार मिळवून दिला आहे. संस्था गेल्या तिन वर्षापासून इयात्ता १ली ते १० विच्या विद्यार्थ्यासाठी राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मुलांमधील सुप्तगुण बाहेर यावेत हा संस्थेचा उद्देश असून स्पर्धेला राज्यभरातून मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही. तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. त्यासाठी महिलांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. तसेच त्यांचे जीवनमानही उंचावले गेले पाहीजे यासाठी संस्था सदैव काम करणार आहे. यासाठी संस्था ‘आर्दश महिला पुरस्कार’, ‘ युवा समाजभूषण पुरस्कार’, ‘ कलाश्री पुरस्कार ’, आदी पुरस्कार संस्थेच्या माध्यमातून देत आहेत. तसेच संस्थेव्दारे प्रत्येक भागात जाऊन व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. श्रीयश एज्युकेशन फौंडेशनच्या माध्यमातून महिलांपर्यंत विविध उपक्रम पोहोचविण्याचा अधिक प्रयत्न करण्यात येणार आहे.

About Us

Established in 2010 under the guidance of Mr. and Mrs. S. S. Sawant, Shriyash Education Foundation aims for the holistic development of women. The primary mission of the organization is to ensure that every woman becomes self-reliant, believing that true social and economic progress is impossible without women’s empowerment.
The foundation conducts various self-employment courses and initiatives throughout the year for rural and urban women. These initiatives cover topics such as women’s health, maternal and child care, adult literacy, superstition eradication, fighting injustice, de-addiction, and rehabilitation for destitute and widowed women. Additionally, the foundation runs old-age homes, contributing to overall women’s integration and upliftment.
Shriyash Education Foundation has provided vocational training in areas like food processing, beauty parlors, jewelry making, bangle work, spice production, bakery products, incense sticks, chalk manufacturing, vermicomposting, traditional powders (Ubtan), paper bag making, nursery management, henna, rangoli, decorative bindis, perfumes, fancy cooking, and dairy processing. These programs have reached women across various localities in Pune, including Dhanakwadi, Aundh, Gokhalenagar, Sangvi, Dhayari, Indiranagar, Katraj, Shivajinagar, Karvenagar, Kondhwa, Kalewadi, Pimpri, Sahakarnagar, Swargate, Vadgaon Sheri, Hadapsar, Pune Camp, Khadki, Kothrud, Warje, Chinchwad, Ghorpadi, Kasba, Narayan Peth, Upper, Bibvewadi, Parvati, and Somwar Peth. Over 10,000 women have received vocational training so far.
Beyond training, the foundation supports women by assisting with personality development, securing stalls for business, and facilitating loans. They also provide platforms for aspiring women entrepreneurs. The organization has helped 100 women and 30 men gain employment.
For the past three years, the foundation has organized state-level drawing competitions for students from grades 1 to 10, aimed at uncovering and nurturing children’s hidden talents. These competitions have received significant participation from across the state.
The foundation firmly believes that the world can only progress when the condition of women improves. They are committed to providing employment and raising the standard of living for women. To recognize and motivate individuals, the foundation awards accolades such as the “Ideal Woman Award,” “Youth Social Achievement Award,” and “Kalashree Award.”
Moving forward, Shriyash Education Foundation plans to expand its efforts, bringing more initiatives and vocational training programs to women across different regions. Their enduring commitment is to ensure women gain the skills and support they need for a brighter, self-reliant future.

आमचे व्यावसायिक प्रशिक्षण

आम्ही महिलांसाठी विविध कौशल्य प्रशिक्षण सेवा प्रदान करतो. या प्रशिक्षणांद्वारे महिलांना व्यावसायिक कौशल्ये, नेतृत्व विकास, आणि आत्मनिर्भरतेची दिशा मिळवून दिली जाते. आम्ही त्यांना रोजगार संधींसाठी तयार करतो तसेच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यास मदत करतो. आमचे प्रशिक्षण महिलांना सक्षम बनवून त्यांच्या भविष्यात उज्जवल संधी निर्माण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

श्रीयश एज्युकेशन फाउंडेशनसोबत महिलांच्या सशक्तीकरणाला सहाय्य करा 

श्रीयश एज्युकेशन फाउंडेशन महिलांना आणि मुलींना शिक्षण, कौशल्य विकास, आणि संधी उपलब्ध करून त्यांचे जीवन बदलण्यास समर्पित आहे. आमचा उद्देश असा आहे की महिलांना एक चांगले भविष्य प्राप्त व्हावे, जिथे त्यांना समाजात योगदान देण्यासाठी, आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक सर्व संधी मिळतील.
तुमचा सहाय्य आपल्याला मोठा फरक साधण्यास मदत करू शकतो. तुमच्या दानामुळे आम्हाला शिष्यवृत्ती, प्रशिक्षण कार्यक्रम, मार्गदर्शन आणि विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळते, जे महिलांसाठी शिक्षण आणि समानतेला प्रोत्साहन देतात.

दान करण्यासाठी किंवा कसे सहभागी होऊ शकता हे जाणून घेण्यासाठी खालील QR कोड स्कॅन करा. प्रत्येक योगदान, छोटं असो किंवा मोठं, आपल्याला कायमचा बदल घडवण्यासाठी मदत करतं.

Bank Details

Donate for a cause

Central Bank Of India

AC/No- 3079424553

IFSC- CBIN0280656

Branch- Shivajinagar

Organization Registration Numbers
12ANo:AAJTS7833AE20219
80GNo:AAJTS7833AF20225 
NITIAYOG No: MH/2021/0276706
CSR No:CSR00031470